तळोजा फेज १ परिसरात आढळला मृतदेह

 



तळोजा फेज १ परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि.२२(संजय कदम): तळोजा फेज १ परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत.


       सदर इसमाचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे, उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, रंग गहूवर्ण, अंगाने माध्यम, डोक्याचे केस काळे वाढलेले, चेहरा गोल, दाढीचे केस काळे मध्यम, मिशीचे केस काळे माध्यम, डोळे काळे असून अंगात गुलाबी रंगाचा हाफ टी शर्ट, पांढरी पट्टी असलेला व राखाडी रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक सुनील घरत यांच्याशी ९७०२०५०८७८ येथे संपर्क साधावा. 
थोडे नवीन जरा जुने