खांदेश्वर येथील महादेव मंदिरात चोरी



खांदेश्वर येथील महादेव मंदिरात चोरी
पनवेल दि.२२(वार्ताहर): पनवेल शहराजवळील खांदा कॉलनी येथील खांदेश्वर महादेव मंदिर येथे रात्रीच्या सुमारास मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.


      पनवेलमधील मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. यापूर्वी ही पनवेल परिसरात तसेच रायगड जिल्ह्यात ठीकठिकाणी मंदिरातील दानपेट्या फोडण्यात आल्या होत्या. यापूर्वी पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरट्यांनी चोरी केली होती, तर चिंचपाडा येथील मंदिरात देखील चोरांनी चोरीचा प्रयत्न केला होता. या चोरीतील आरोपींना अटक केली होते. त्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीकडे लक्ष वळवले आहे. खांदेश्वर ठाणे हद्दीतील खांदेश्वर महादेव मंदिरात दानपेटी चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यात चार अनोळखी व्यक्ती चोरी करताना दिसून येत आहेत.
थोडे नवीन जरा जुने