प्लॉट खरेदी व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक




प्लॉट खरेदी व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक
पनवेल दि.२१(वार्ताहर): प्लॉट खरेदीसाठी दिलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्या प्रकरणी सुधाकर सुखदेव सावंत यांच्या विरोधात खादेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



      सेक्टर १९, नवीन पनवेल येथील जागेश्वर नारायण झोडे यांना ग्लोबल इंडिया इंटरप्राईजेस चे मालक एजंट सुधाकर सावंत यांनी २९ गुंठे जमीन त्यांची मालकीचे नसताना देखील ती त्यांच्या मालकीची आहे असे खोटे सांगितले व सदरची जमीन विक्री करायची असून भविष्यात या जागेच्या जवळून मोठा रोड येणार आहे व प्लॉट खरेदी तीन केल्यावर गुंतवलेल्या पैशांचे काही वर्षातच दुप्पट पैसे होतील असे सांगितले. 



त्यामुळे झोडे यांनी त्यांची पत्नी यांच्या नावे यावे गुंठे, मुलगी यांच्या नावे तीन गुंठे असे "सहा गुंठ्याचे प्लॉट खरेदी करण्यासाठी अकरा लाख ६९ हजार ५०० रुपये सावंत यांच्या बँकेत जमा केले. त्यानंतर ते सावंत यांना वेळोवेळी संपर्क करत होते व प्लॉट खरेदीसाठी दिलेली रक्कम परत मागितली. यावेळी तो टाळाटाळ करू लागला. काही दिवसांनी फोन देखील उचलत नव्हता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार प्लॉट खरेदीसाठी दिलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्या प्रकरणी सुधाकर सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने