टास्कच्या नावाखाली २० लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक




टास्कच्या नावाखाली २० लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक
पनवेल दि.२१ (वार्ताहर): वेगवेगळे टास्क देऊन ते करण्यास भाग पाडून २० लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात दिर्यालाल, किंजल पांचाल, बिष्ट सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


       खारघर, सेक्टर ३५ जी येथे राहणारे अभिनव संतोष कुमार दुबे यांना पार्ट टाइम जॉब अपर्च्यूनिटीबाबत फोन आला होता. यावेळी ऑनलाइन बिजनेस, गेम याला प्रमोट करण्याचे काम करत असल्याचे सांगण्यात आले. व त्याचे पैसे मिळतात असे दुबे यांना सांगितले. त्यानंतर त्यांना टेलिग्राम एप्लीकेशन डाउनलोड केले. यावेळी वैयक्तिक माहिती भरली व १६ रुपये खात्यात जमा झाले. त्यानंतर टेलिग्राम वर नवीन ग्रुप जॉईन करण्यास सांगून टास्क खेळण्यास सांगितले. प्रत्येक टास्कला पैसे मिळतील असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना एक हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यात सांगितले. ते पाठवल्यानंतर त्यांनी टास्क कोड दिला यावेळी त्यांना तेराशे रुपये पेमेंट पाठवण्यात आले.



 जास्त टास्क केल्यास जास्त नफा होईल असे सांगण्यात आले. त्यांना ६७ हजार रकमेचा टास्क आला. ती रक्कम त्यांनी भरली. त्यानंतर एक लाख ६८ हजार रुपये चा टास्क आला. चौथा टास्क त्यांना तीन लाख ८३ हजार रुपयांचा आला. असे करता करता त्यांनी एकूण आठ टास्क साठी २० लाख ६१ हजार रुपये भरले. त्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असून कोड सुधारण्यासाठी दहा लाख रुपये रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले. यादरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार दाखल केली.


थोडे नवीन जरा जुने