पनवेल परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

पनवेल परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
पनवेल दि २४( संजय कदम) : पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.               सदर इसमाचे अंदाजे वय ६० ते ६५ वर्षे नाक सरळ, डोक्याचे व दाढी मिशी चे केस पांढरे वाढलेले असून अंगात फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट व त्यावर क्रीम रंगाचा चौकटी असलेला शर्ट घातलेला आहे . या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने