वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून खुर्च्यां प्रदान.





उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील वशेणी आणि पुनाडे गावात गेली शंभराहून अधिक वर्ष पंपरपागत अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.दर वर्षी श्रावण कृष्ण प्रतिपदेला सुरू होणा-या या सप्ताहाचे औचित्य साधून जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून खुर्च्यां प्रदान सोहळा संपन्न झाला. या खुर्च्यां प्रदान सोहळ्यात श्री हनुमान मंदिर वशेणी, राधाकृष्ण मंदिर वशेणी आणि श्री हनुमान मंदिर पुनाडे येथे मंदिरात भाविकांना बसण्यासाठी एकूण 23 खुर्च्यां देण्यात आल्या




.सदर खुर्च्यां वशेणी इतिहास संपादकीय मंडळ, बळीराम चांगदेव म्हात्रे, अनंत पाटील, डाॅक्टर रविंद्र गावंड आणि मच्छिंद्र म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आल्या.सदर कार्यक्रमास गणेश खोत,ए.बी.तांडेल,पुरूषोत्तम पाटील,हरेश्वर पाटील, सतिश पाटील,कैलास पाटील,प्रमोद पाटील, संदेश गावंड,ग्रामपंचायत सदस्य सुनिल ठाकूर, प्राध्यापक शिवहरी गावंड,राघव म्हात्रे, एकनाथ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने