शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने होऊ द्या चर्चा अभियानाची पनवेल तालुक्यात सुरूवात; भाजपचा खोटारडेपणा आणणार जनते समोर







शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने होऊ द्या चर्चा अभियानाची पनवेल तालुक्यात सुरूवात; भाजपचा खोटारडेपणा आणणार जनते समोर
पनवेल दि. ०४ (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यात सुद्धा रायगडजिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पनवेल तालुक्यातील चिंध्रण, शिरवली, भेकरेवाडी आदी भागांमधे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन येथील जनतेला भाजपा करीत असलेल्या खोटारडेपणा लक्षात आणून देण्याचे काम होऊ द्या चर्चा या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.



या अभियानाच्या माध्यमातून जनतेची संवाद साधताना शिवसेना सरकारच्या यशोगाथाची माहिती देत सध्याचे भाजप सरकार करीत असलेला खोटारडेपणा, रखडलेल्या योजना, प्रलंबित प्रकल्प, वाढती महागाई, बेरोजगारी आदी संदर्भात त्यांची माहिती सुद्धा जनतेला देण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, उपमहानगर प्रमुख रामदास गोधळी, शाखा प्रमुख काशिनाथ पाटील, जेष्ठ शिवसैनिक हिरामण भोईर, गटप्रमुख अशोक कुंभारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने