पनवेल दि. ०४ (संजय कदम): जालना येथील मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्लाचा आज सकल मराठा समाजाने पनवेल येथील व्ही.के.हायस्कुल येथे एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला व या लाठी हल्ल्याची जबाबदारी शासनाने स्वीकारून त्यानी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे.
यावेळी सकल मराठा समाज पनवेलचे गणेश कडू, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, राकेश टेमघरे. रोहित टेमघरे, पराग मोहिते, कुणाल कुरघोडे यासह अनके मराठा समाज बांधव एकवटले होते. यावेळी बोलताना प्रवीण जाधव यांनी सांगितले की, मागील चार दिवसांपासून जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाकडून संविधानिक पद्धतीने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी उपषोणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या मदतीने सदर आंदोलन चिरडण्यासाठी मराठा समाज बांधवांवर अमानवीय पद्धतीने लाठीहल्ला व हवेत गोळीबार केला गेला. सदर लाठीहल्ल्यात मराठा समाजाच्या माता भगीनी व लहान मुलांवर देखील पोलीसांमार्फत लाठीहल्ला केला गेला, या अमानवीय लाठी हल्ल्यात अनेक मराठा बांधव व माता-भगिनीं मुले हे गंभीर जखमी झाले आहेत.
या निंदनिय घटनेचा आम्ही सफल मराठा समाज रायगड म्हणून राज्यसरकारचा व लाठीहल्ला करणाऱ्या पोलीसांचा जाहीर निषेध करीत असल्याचे सांगितले तर गणेश कडू यांनी सांगितले की ,सदर घटनेची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारून, सदर प्रकारात दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा रायगड जिल्ह्यात पुढे होणारे आंदोलन हे अधिक तीव्र असेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारचीच असेल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. यावेळी सरकारच्या बेजाबदारपणाची माहिती शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा देण्यात आली.
Tags
पनवेल