आशिष नाईक मित्र मंडळाच्या वतीने तक्का येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; २,२२,२२२ रुपयांची घवघवीत बक्षीसेआशिष नाईक मित्र मंडळाच्या वतीने तक्का येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; २,२२,२२२ रुपयांची घवघवीत बक्षीसे
पनवेल दि.०४(संजय कदम): आशिष नाईक मित्र मंडळाच्या वतीने यंदाही पनवेल जवळील तक्का येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी उपस्थित व सहभागी मंडळांना २,२२,२२२ रुपयांची घवघवीत बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.  गुरुवार दि.०७/०९/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता आशिष नाईक मित्र मंडळ पनवेलच्या वतीने तक्का येथे दहीहंडी उत्सवाचे करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्याय यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला आहे. सदर दहीहंडी ही संत सावता माळी हॉल जवळ तक्का रोड पनवेल येथे करण्यात आला आहे. तरी दहीहंडी मंडळांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन मांडला तर्फे करण्यात आले आहे. 


थोडे नवीन जरा जुने