पनवेल/प्रतिनिधी -- जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलक जखमी झाले. याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पनवेल परिसरातील विध्यार्थीनीं करंजाडे येथील महात्मा फुले ए.एससी कॉलेजच्या आवारात सोमवारी 4 सप्टेंबर रोजी दुपारी जाहीर निषेध करण्यात आले.
सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजातील संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाजातील नागरिक सोमवारी दुपारी आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसीमधूनच आरक्षण देणे आवश्यक असून, त्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. याच मागणीसाठी आंदोलन होते. आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज झाला, ही चुकीची घटना असून सरकारचा निषेध म्हणून सकल मराठा समाज बांधवांवर जालना येथे केलेल्या लाठी हल्ल्याच्या मराठा समाजाचे विध्यार्थी म्हणून जाहीर निषेध करण्यात आला.
आरक्षण नसल्यामुळे आमची स्वप्नं बदलावे लागते..
आमच्याकडे पैसा नाही. आई वडिलांनी कष्टाने आम्हांला शिक्षण देतात ते कश्यासाठी, आमचं भविष्य घडविण्यासाठी. आणि ते भविष्य चांगल घडविण्याचे असेल तर आमच्याकडे हक्कचं नसल्याने आम्हांला भरमसाठ फी भरावी लागते. सरकारला विनंती आहे. आम्हां विध्यार्थीकडे लक्ष देऊन लवकरच आरक्षण जाहीर करावे -- विध्यार्थीनीं
मराठी समाजासाठी आपण पाठी हटलो नाही पाहिजे..
मार्क आम्हांला चांगले असूनही आम्हांला फायदा होतं नाही. सर्व परीक्षामध्ये आम्हां विध्यार्थी सहभाग घेतो. हवे ते परीक्षा देता येत नाही. शिक्षणासाठी आम्हांला आमचा वाटा हक्क हा मिळालाच पाहिजे. - विध्यार्थीनीं
Tags
पनवेल