सराईत रिक्षा चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड






सराईत रिक्षा चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड  
पनवेल दि. १२ ( संजय कदम ) :- पनवेल परिसरात दोन रिक्षा चोरणाऱ्या सराईत चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या कडून चोरीच्या दोन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत . 





          शहरातील मनोज अनता अरिवले यांची रिक्षा सावरकर चौक परिसरातून ४० हजार रुपये किमतीची चोरीस गेली होती त्याच प्रमाणे २५ हजार किमतीची दुसरी रिक्षा सुद्धा चोरीस गेली होती . या रिक्षा चोरी संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार,पोहवा सुर्यकांत कुडावकर , पोना महेश पाटील, , पोना आमोल प्रल्हाद पाटील, पोना अशोक राठोड , पोशि दाहिजे आदींचे पथक सदर आरोपीचा शोध तांत्रिक तपासाद्वारे व गुप्त बातमीदाराच्या माहितीने घेत असताना आरोपी प्रशांत सुनिल चव्हाण, वय - ३१ वर्ष हा बस स्टैंड स्टेशन चौकी, शिवाजी नगर, पुणे येथे असल्याबाबत माहीती प्राप्त झाल्याने या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने रिक्षा चोरीची कबुली दिल्याने त्याच्या कडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने