आगामी गणपती बाप्पाच्या आगमनार्थ शहरातील मिरची गल्ली परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची महानगरपालिकेकडे शिवसेनेची मागणी








आगामी गणपती बाप्पाच्या आगमनार्थ शहरातील मिरची गल्ली परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची महानगरपालिकेकडे शिवसेनेची मागणी  
पनवेल दि. १२ ( वार्ताहर ) :- आगामी गणपती बाप्पाच्या आगमनार्थ शहरातील मिरची गल्ली परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेकडे शिवसेनेचे विभागप्रमुख ऍड . आशिष पनवेलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे .  




               या निवेदनात ऍड . आशिष पनवेलकर यांनी म्हंटले आहे की ,पनवेल शहरातील मिरची गल्ली रस्ता हा मागील तीन महिन्यांपासुन नादुरूस्त अवस्थेत असुन खडयामध्ये रस्ता आहे अशी परिस्थिती आहे परंतु मिरची गल्ली रस्ता येथुन कुंभारवाडा, मिरची गल्ली, वाणी आळी, येथुन जवळ पास ५०० ते ६०० घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणपती बाप्पाचे आगमन सोहळा व विसर्जनासाठी येत जात असते , त्यामुळे रस्त्यावर झालेल्या खड्यांमुळे गणेशमुर्तीची कोणतीही हानी होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे म्हणुन आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने या नागरी समस्यांकडे लक्ष घालून मिरचीगल्ली रस्ताची लवकरात लवकर दुरूस्ती करावी ही मागणी त्यांनी केली आहे . 



थोडे नवीन जरा जुने