पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व खारघर शहरातील खड्डेमय रस्ते गणेशोत्सव आगमनापुर्वी दुरुस्त करावेत; युवासेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी






पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व खारघर शहरातील खड्डेमय रस्ते गणेशोत्सव आगमनापुर्वी दुरुस्त करावेत; युवासेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल महानगरपालिकेकडे मागणी



पनवेल दि.२९(संजय कदम): युवासेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व खारघर शहरातील खड्डेमय रस्ते गणेशोत्सव आगमनापुर्वी दुरुस्त करावेत अशी मागणी वासेना उपजिल्हाप्रमुख अवचित राउत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.



पावसाळयामुळे पनवेल महानगर क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांचा मुळे चाळण झाली असुन सर्व नागरीकांना रोज वाहतुकीकरता त्रास सहन करावा लागत आहे सोबतच गणेशोत्सव तोंडावर आला असल्यामुळे गणेश भक्तांना याचा त्रास सहन करावा लागु शकतो त्यामुळे नागरीकांच्या व गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्वरीत रस्ते दुरुस्ती करावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अवचित राउत, प्रभाग अधिकारी निखिल पानमंद, युवासैनिक अश्विन ससाने, अविनाश जाधव, सत्यपाल पवार यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने