- आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने पुनर्वसन झालेल्या पुष्पक नोड सेक्टर १ नवीन वरचे ओवळे परिसराला डोंगरापासून संरक्षण होण्याकरिता तारेची संरक्षण भिंत उभारण्यात येणार असून याकामी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सिडकोमार्फत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
वरचे ओवळे गावचे नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळच्या अनुषंगाने पुनर्वसन झाले आहे. सदर पुर्नवसन महात्मा फुले कॉलेजच्या शेजारी पुष्पक नोड सेक्टर १ नवीन वरचे ओवळे या नावाने झाले आहे. या ठिकाणी गावाच्या बाजूला मोठा डोंगर आहे. आणि ह्या डोंगराच्या लगत ये-जा करण्यासाठी मार्ग आहे. पावसाळ्यात ह्या ठिकाणी मोठया प्रमाणात भुसखलन होऊन ईमारतीना व रहिवाशांना धोका निर्माण झाला असून सर्व मार्ग मातीखाली गेले आहेत. त्यामुळे डोंगर बाजूने सुरक्षा होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मुंबई पुणे महामार्गावर डोंगराला करण्यात आलेल्या मजबूत तारांचे आवरण प्रमाणे या ठिकाणी डोंगराला मजबूत तारांचे संरक्षक भिंत उभारण्याची मान्यता दिली असून त्यासाठी सिडकोने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या संदर्भात निविदा प्रकियाही करण्यात आली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले.
Tags
पनवेल