करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ






करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ

पनवेल (प्रतिनिधी) सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे करंजाडे रोड मधील सेक्टर ६ च्या रहिवाशांना असंतुलित पाणीपुरवठा होत होता. सरपंच मंगेश शेलार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंबर कसली होती. सेक्टर सहा मधील रहिवाशांकरता वेगळी पाण्याची जोडणी दिल्यास तेथे मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो याची खात्री झाल्यानंतर सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभ हस्ते पाणीपुरवठा जोडणीच्या प्रत्यक्ष कामास शुभारंभ करण्यात आला.


           आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश शेलार आणि त्यांची टीम अत्यंत कसोटीने काम करत आहे. करंजाडे विभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यासाठी मंगेश शेलार व त्यांचे सदस्य सहकारी नेहमीच तैनात असतात. पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावताच ती समूळ नष्ट करण्याकडे सरपंच मंगेश शेलार यांचा कल होता.सोमवारी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.


नव्या पाईपलाईनच्या भूमिपूजन समारंभासाठी सरपंच मंगेश शेलार यांच्या समवेत विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, भाजपा तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, उपाध्यक्ष नाथाभाई भरवाड, भाजपा शहर सरचिटणीस सचिन कदम, बळीराम भोईर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने