परिणीता सोशल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित रक्षा बंधन स्पेशल प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परिणीता सोशल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित रक्षा बंधन स्पेशल प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल दि.२९(वार्ताहर): परिणीता सोशल फाऊंडेशनच्यावतीने पनवेल शॅपी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनावे उद्घाटन भागुबाई ठाकूर महाविद्यालयाच्या कार्यकारिणी सदस्या अर्चना परेश ठाकूर यांच्याहस्ते झाले.


भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सन दोन दिवसांवर आला असून या सणाच्या पार्श्वभुमीवर रक्षा बंधण स्पेशल वस्तू या प्रदर्शनात विक्रीकरीता उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन सोमवारी आणि मंगळवार दरम्यान गोखले हॉल मध्ये संपन्न होणार असून या प्रदशनाचे उद्घाटन *भागुबाई ठाकूर महाविद्यालयाच्या कार्यकारिणी सदस्या अर्चना परेश ठाकूर यांच्याहस्ते झाले. यावेळी *डिस्ट्र्निटर लायन्स क्लबचे डिस्ट्र्निट गव्हर्नर मुकेश तरनेजा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, श्री सद्गुरू कॉटर्रसचे मालक सुयोग पेंडसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या प्रदर्शनाला नागरिकांचा व प्रामुख्याने महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थोडे नवीन जरा जुने