स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न; कार्यकर्ता मेळाव्या बाबत करण्यात आली सविस्तर चर्चा
पनवेल दि.२७(संजय कदम): स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील पदाधिकारी यांची बैठक पक्षाचे मुख्य कार्यालय वडाळा येथे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाली. या बैठकीमध्ये लवकरच मुंबईतील सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते यांच्या मेळावा घेण्यासंदर्भातील सविस्तर चर्चा करण्यात आली.  
      यावेळी पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर भाई संसारे, महासचिव अशोक वाघमारे, महाराष्ट्र संघटक भगवान गरुड, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अरुण धिवर, मुंबई नेते अरुण जाधव, विजय पवार व प्रमुख मार्गदर्शक म्हणून रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे उपस्थित होते. या बैठकीमध्ये लवकरच मुंबईतील सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते यांच्या मेळावा घेण्यात येणार आहे.


 त्याचप्रमाणे विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती अध्यक्ष सागर भाई संसारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . या मेळाव्यापूर्वी सर्व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकास भेट देणार आहेत. दरम्यान पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल येथील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले आहे. रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी महाड, मंडणगड व खेड या तालुक्यांचा दौरा आयोजित केला आहे. सद्याची राजकीय परिस्थिती व पक्षाची आगामी वाटचाल या विषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व पक्ष संघटना वाढवण्याकरता हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.थोडे नवीन जरा जुने