पनवेल दि.२७(संजय कदम): आगामी येणारा गौर गणपती गणेश उत्सव हा शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व मंडळांनी साजरा करावा असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्यात आयोजित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी केले.
पनवेल शहरात यंदा गौर गणपती उत्सवाचे एकूण ३२ मंडळ असून त्यापैकी आजच्या बैठकीला २८ मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले की, सॅन उत्सव हे सर्वानी एकत्रीत येऊन नियम अटी शर्तींचे पालन करून साजरे करावेत, शासकीय यंत्रणांना सहकार्य करून कार्यकर्त्यांनी उत्साहात हे सण साजरे करावेत असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. या बैठकीला गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव उपस्थित होते. त्यांनी उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध परवानग्यांबाबत माहिती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
Tags
पनवेल