मोरा कोळीवाडा गावठाण सीमांकनाचा मार्ग मोकळा.






मोरा कोळीवाडा गावठाण सीमांकनाचा मार्ग मोकळा.
जिल्हा भूमी अभिलेख रायगडचे निर्देश.



उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )मौजे मोरा कोळीवाडा मुळ गावठाण आणि विस्तारीत गावठाण यांचे शेवटच्या घरापर्यंतचे, गावाशेजारील समुद्रातील बंदर, बोटी पार्किंगच्या जागांच्या सर्व्हे करून, घरांचे प्रॉपर्टीकार्ड, मोकळया जागा, मार्केट बंदर, मासे सुकविणेच्या जागा यांचे सिमांकन करुन लोकवर्गणी, लोकसहभागातून गावठाण प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी व मा. जिल्हा भूमि अभिलेख यांना सादर करणे संदर्भात मुनीर आतार उप अधीक्षक, भूमी अभिलेख उरण, जिल्हा रायगड यांनी मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीच्या पत्राची व मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला आहे. मोरा कोळीवाडा गावठाण विस्तार व सीमांकन बाबत रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.



मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीच्या माध्यमातून मोरा कोळीवाडा विस्तारित गावठाण यांचे शेवटच्या घरापर्यंतचे, गावाशेजारील समुद्रातील बंदर, बोटी पार्किंगच्या जागा, घराचे पॉपर्टी कार्ड, मोकळ्या जागा मार्केट बंदर, मासे सुकविण्याच्या मिळकती तसेच लगतच्या जागेची सर्व्हे करण्याची मागणी करण्यात आली होती. मोरा कोळी वाडाचे सीमांकन तसेच गावठाण विस्तार करणे कामी मोरा कोळीवाडा ग्राम विकास समितीच्या माध्यमातून मोरा ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रशांत दत्ताराम कोळी,शेखर रामा कोळी,सुहास भरत कोळी,मुरलीधर हरी कोळी,हेमंत गोविंद कोळी,नंददीप मोरेश्वर कोळी,राकेश नामदेव कोळी आदी पदाधिकाऱ्यांनी याबाबत सतत पाठ पुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आले असून संबधित मागणी संदर्भात मुनीर आतार उप अधीक्षक भूमी अभिलेख उरण यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.



मोरा कोळीवाडा बाबत विस्तारीत गावठाणांचा प्रस्ताव संपूर्ण सिमांकन केलेला नकाशा, मिळकतींची माहिती,ग्रामपंचायतीचा ठराव, तसेच लागत मिळकती असलेल्या सर्व्हे नंबर मधील धारकांची संमती व मा. सक्षम प्राधिकारी यांचेकडील आदेश इत्यादी माहितीसह विहीत मार्गे प्राप्त झालेनंतर नियमोचित महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १२२ अन्वये गावठाण विस्तार बाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यास त्या अनुषंगाने गावठाण विस्तार भूमापन बाबत कार्यवाही करण्याची तजवीज ठेवत आहोत असे मुनीर आतार उप अधीक्षक भूमी अभिलेख उरण यांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने