उरण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचा होऊ दे चर्चा अभियानाचा दमदार शुभारंभ






उरण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचा 'होऊ दे चर्चा' अभियानाचा दमदार शुभारंभ



शिवसेना उपनेते सचिनभाऊ अहिर, जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांचे प्रमुख उपस्थिती.




उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये व गावागावांमध्ये हाती घेण्यात आलेले आहे, याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी उरण विधानसभा मतदार संघासाठी 'होऊ द्या चर्चा अभियान' कार्यक्रम श्रीराम मंदिर सभागृह, उरण शहर येथे शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्याने शुभारंभ करण्यात आला. तसेच मावळ लोकसभा मतदार संघासाठी 'होऊ द्या चर्चा अभियानासाठी' शिवसेना उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांच्यावर पक्षाने धुरा सोपवलेली आहे.



या सभेच्या प्रारंभी शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ड्याशिंग उपनेते, माजी रायगड जिल्हा पालकमंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होऊ द्या चर्चा या अभियानास सूरूवात करण्यात आली.शिवसेना उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांचा मायेची उपदार शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जिल्हा समन्वयक श्री. सावंत , उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) श्री धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख (उरण) महादेव घरत, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील,चौक जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष उत्तमशेठ भोईर, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहीते, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकुर,वसंत आगीवले, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, उरण तालुका संघटिका भावना म्हात्रे, पनवेल तालुका संघटिका मेघा दमडे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, मुमताज भाटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 



'होऊ द्या चर्चा' अभियानामध्ये जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा समन्वयक श्री. सावंत ,उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकुर व उरण उपतालुका संघटिका व पालघर जिल्हा वक्ता मनीषा ठाकुर यांनी उरण मतदार संघातील तसेच सरकारच्या बोलघेवड्या विविध योजनांचा भाडा फोड करून संपुर्ण उरण मतदार संघातील जनतेला सरकार जनतेची करत असलेली दिशाभूल नागरिकांच्या समोर आणन्यासाठीच होऊ द्या चर्चा सभा प्रत्येक गावात घेऊन जनतेत जागृतता निर्माण करण्यासाठीच शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.  



यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित शिवसेना पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना संबोधित करताना सांगितले कि,आमदार मनोहरशेठ भोईर शांत संय्यमी नेतृत्व असून आमदार असताना विविध विकासकामे केलेली असतानाही त्यांचा निवडणूकीत पराभव झाला आणि या ठिकाणी अपक्ष निवडून आला. उरण मतदार संघात शिवसेनेची बलाढ्य ताकद असताना अमिषे देऊन एक अपक्ष निवडून येतो जनेतेला विकासाचे स्वप्न दाखवतात परंतु मतदार संघात विकास मात्र होताना दिसत नाही. सरकारच्या बोलघेवड्या योजनांची खरी सत्यता कार्यकत्यांनी होऊ द्या चर्चेतून जनतेपर्यत सत्य माहिती पोहचवावी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनोहरशेठ भोईर यांना आमदार बनवा असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये जागृत केला.माजी आमदार आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, मागील निवडनुकीत माझा पराभव झालेला नसून पक्षाचा पराभव झाला आहे. मी आमदार असतांनाही मतदार संघात विकासकामे केली आहेत.माझा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर ही मी स्वस्थ न बसता उरण मतदार संघात विकासकामे तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. होऊ द्या चर्चाच्या माध्यमातून शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख हा उरण मतदार संघात बेलाघेवडा सरकारच्या विविध योजनेचा भांडा फोड गावागावात जाऊन होऊ द्या चर्चा सभांचे आयोजन करून करेल आणि उरण मतदार संघातील जनतेला जागृत करेल असा विश्वास पदाधिका-यांना देताना सांगितले, मागील निवडणूकीत युती असताना युती धर्माचे पालन झाले नाही आणी यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले परंतु यावेळी आपल्या सोबत काॕग्रेस, राष्ट्रवादी काॕग्रेस,शेकाप असल्यामुळे आपण विरोधकाला ५०,००० हजाराचा लीड देऊन आपला विजय होणारच असा विश्वास व्यक्त करून मरगळ झटकून गावागावात होऊ द्या चर्चा सभेतून बोलघेवड्या सरकारचा भांडा फोड करून जनते जागृत करा असे त्यांनी कार्यकर्त्यांना अहवान केले.



'होऊ द्या चर्चा अभियान' कार्यक्रमास उरण विधानसभेतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महिला पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर या कार्यक्रमाचे आयोजन उरणचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, युवासेनेचे सुशांत तांडेल व शिवसेना उरण शहरातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी केले होते, कार्यक्रमाचे सुरेखपणे सूत्रसंचालन नितेश पंडीत यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने