मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन ठाणे उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांना काँग्रेस ओबीसी कोकण विभागाच्या वतीने देण्यात आले.या वेळी कोकण विभागीय अध्यक्ष शंभो म्हात्रे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील खेडे,प्रदेशचे अनिल भगत,ठाणे ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष तुषार देसले,ठाणे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे,भिवंडी जिल्हाध्यक्ष अनंता पाटील,कल्याण शहर अध्यक्ष जयदिप सानप,संतोष शिंदे,मखाराम पाटील,धनाजी गोंधळी,संजय शिंदे यांच्यासह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागली आहे. आणि महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला कुणबी मध्ये समाविष्ट करून त्यांचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचा त्यासाठी कडाडून विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन नवा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा भाजपचा कुटिल डाव आहे तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.असे यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष शंभु म्हात्रे यांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने