उरण आगारातून कोकणवासीयांसाठी ज्यादा बसेसची व्यवस्था.






उरण आगारातून कोकणवासीयांसाठी ज्यादा बसेसची व्यवस्था.



उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )मुंबई व नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातील कोकण वासियांना गणेशोत्सव आनंदाने साजरा करता यावा म्हणून कोकण वासियांना गणेशोत्सवात आपल्या मूळ गावी म्हणजेच कोकणात जाण्यासाठी दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष मंडळ उरण बस आगारातून मोठया प्रमाणात वाहनांची व्यवस्था करत असते. दरवर्षी कोकणातील प्रवाशी उरण आगारातून कोकणात विविध जिल्ह्यात, तालुक्यात जात असतात.



 या वर्षीही कोकणवासीय उत्कृष्ट मंडळातर्फे उरण आगार व्यवस्थापक यांना गणेशोत्सवसाठी ज्यादा बसेस सोडण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. आगार व्यवस्थापक यांनी ती मागणी मान्य केली. यावर्षी उरण गुहागर मार्गे गणपती पुळे, उरण -दाभोळ, उरण रत्नागिरी, उरण ते चिपळूण, उरण ते खेड, उरण ते लांजा अशा गाड्या सोडण्यात आले आहेत. सर्व बसेस फुल्ल झालेले आहेत. यावेळीहि जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे कोकणवासीय उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. हे सर्व कार्य कोकण वासीय उत्कर्ष मंडळाचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी, मार्गदर्शक संतोष पवार, अजय भोसले, प्रमोद पाटोळे यांच्या प्रयत्नामुळे झाल्याने प्रवाशी वर्गांनी या कोकण वासीय उत्कर्ष मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.


थोडे नवीन जरा जुने