अपघात टाळण्यासाठी मनसेतर्फे लावण्यात आले दिशादर्शक फलक.
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमदार राजूदादा पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सचिन मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त उरण पनवेल रस्त्यावर फुंडे हायस्कुल येथे दुभाजकामुळे अनेक अपघात होतात ते टाळण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून रेडीयम (दिशादर्शक) फलकाचे अनावरण मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, तालुका सचिव अल्पेश कडू, तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, राकेश भोईर, उरण शहराध्यक्ष धनंजय भोरे, द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील, उरण उपशहर अध्यक्ष हितेश साळुंखे ,उपशहर अध्यक्ष राजेश सरफरे,फुंडे शाखा अध्यक्ष रोनित म्हात्रे ,भेंडखळ शाखा अध्यक्ष अभिजीत पाटील, जसखार शाखा अध्यक्ष अजित ठाकूर,रितेश ठाकूर,कौशिक भोईर आणि इतर पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने