उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )केंद्र व राज्य शासना तर्फे स्वच्छता विषयक विविध अभियान, उपक्रम सुरु असून " स्वच्छता हिच सेवा " अंतर्गत घारापुरी येथील समुद्र किनारा व परिसरात दिनांक २७/०९/२०२३ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी भारतपर्यटन, महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग आणि ग्रामपंचायत घारापुरी यांचे संयुक्त विद्यमाने सदरचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी भारतपर्यटन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग आणि घारापुरी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. स्वच्छता अभियान राबविल्याने घारापुरी परिसर स्वच्छ व सुदंर झाले आहे.
Tags
पनवेल