प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी शेमटीखार प्रकल्पग्रस्तांचे रांजणपाडा रेल्वेस्टेशन समोर आमरण उपोषण
उरण दि. 9 (विठ्ठल ममताबादे ) धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वेस्टेशन येथे व रेल्वेशी संबंधित विकास कामात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दयावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणी साठी व रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन व ठेकेदार यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था व ग्रामस्थ मंडळ धूतूमच्या वतीने सोमवार दि 9/10/2023 रोजी सकाळी 10 वाजल्या पासून आमरण उपोषण सुरू झाले आहे. दि. 9/10/2023 रोजी आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे. यावेळी उपस्थित शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की आमच्या जमीनी कवडीमोल भावाने सिडकोने संपादित केल्या. त्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरीता वापरण्यात आल्या. रांजणपाडा हे नविन रेल्वे स्थानक धुतुम महसूल हद्दीत मोडते. त्यामुळे रांजणपाडा रेल्वे स्टेशन व रेल्वेशी संबंधित विविध विकास कामा संदर्भात रोजगार व नोकरीचा पहिला हक्क हा धूतूम प्रकल्पग्रस्तांचा आहे.
मात्र रेल्वे व रेल्वे सदर्भात नोकरी तसेच रोजगार भरती मध्ये धुतुम मधील प्रकल्पग्रस्तांना डावलून भरती केली जात आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता हि भरती ठेकेदारांमार्फत सुरु आहे. अनेक वेळा ठेकेदार व प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेटून सदर अन्यायाबाबत जाणीव करून सुद्धा प्रकल्पग्रस्तांना भरती मध्ये डावलले जात असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रांजणपाडा रेल्वे स्टेशन समोर आमरण उपोषण करत असल्याची माहीती शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी दिली.या उपोषणाला सर्व राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्यक्ष उपोषणात सहभागी होत आहेत अशीही माहिती विनोद ठाकूर यांनी दिली
.या उपोषणात अध्यक्ष विनोद ठाकूर, उपाध्यक्ष रेश्मा ठाकूर, सेक्रेटरी रणजित ठाकूर,खजिनदार विनोद घरत, प्रकल्पग्रस्त -लीलाधर घरत, सुंदर ठाकूर, अनंत ठाकूर, राम ठाकूर, किशोर पाटील, अविनाश ठाकूर, शरद ठाकूर, मनोहर ठाकूर, काशिनाथ ठाकूर, हरी ठाकूर, मेघनाथ ठाकूर, गणेश पाटील आदी प्रकल्पग्रस्त व शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था व धुतुम ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.महिला भगिनीचीही उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकूर, तालुका सचिव दिनेश पाटील, माजी उपसरपंच शरद ठाकूर,कामगार नेते संतोष घरत,कामगार नेते एन बी कुरणे,जेष्ठ नागरिक दत्तू ठाकूर,राजेश ठाकूर यांनी उपस्थित राहून, प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
Tags
उरण