शिवसेना उरण तालुका शिव विधी व न्याय सेना ची कार्यकारिणी मंडळाची नियुक्ती जाहीर
शिवसेना उरण तालुका शिव विधी व न्याय सेना ची कार्यकारिणी मंडळाची नियुक्ती जाहीरउरण दि 9(विठ्ठल ममताबादे )
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे)पक्षाची उरण तालुका शिव विधी व न्याय सेना ची सेनाभवन येथे कार्यकारिणी मंडळाची पुढीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली.  ऍड.वर्षा अरुण पाठारे अध्यक्ष, 
 ऍड.मच्छिंद्रनाथ घरत उपाध्यक्ष,
ऍड.जागृती चेतन गायकवाड चिटणीस, ऍड विशाल कुंदन पाटील सरचिटणीस,ऍड ममता भाईचंद्र पाटील सदस्य,
ऍड निनाद हरिश्चंद्र नाईक सदस्य,
ऍड प्रशांत पाटील सदस्य,
ऍड विद्या अमित म्हात्रे सदस्य,
ऍड अमर पाटील सदस्य,ऍड रजनीकांत गणेश पाटील सदस्य,
ऍड नितेश नितीन पाटील सदस्य,
यांना शिवसेनाभवन येथे नियुक्ती पत्र देण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे गट ) पक्षाचे कोणत्याही शिवसैनिकला व सामान्य जनतेला कायदेशीर मदत, सल्ला देण्यासाठी तसेच सेनेच्या वकिलांना योग्य ती मदत करणे, त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्यांच्या सोबत ठाम उभे राहणे या हेतूने या शिव विधी व न्याय सेना ची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अँड नितेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली आहे.सदर कार्यक्रम साठी शिव विधी व न्याय सेनेचे सरचिटणीस ऍड.ओरॅलियस डिसिल्व्हा, समन्वयक ऍड.भुषण मेंगडे,अध्यक्ष कोकण व गोवा विभाग ऍड ज्ञानेश्वर कवळे, बेलापूर अध्यक्ष ऍड मुरली पाटील व बेलापूर उपाध्यक्ष ऍड.किर्ती पांचाळ उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने