राजू मुंबईकर यांच्या सौजन्याने रा.जि.प. शाळा पाले येथे भेट देण्यात आला स्मार्ट टिव्ही संच.






राजू मुंबईकर यांच्या सौजन्याने रा.जि.प. शाळा पाले येथे भेट देण्यात आला स्मार्ट टिव्ही संच.



उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी म्हणून आज प्रत्येक क्षेत्रा सोबतच प्रत्येक माध्यम सुद्धा उपयुक्त ठरतं आहे.असचं एक माध्यम सोशल मीडिया आणि इंटरनेटच झालंय. विविध प्रकारच्या मिहितिची देवाण - घेवाण करण्याकरिता तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थीवर्ग शिक्षण घेत असतात.आणि याच नवं तंत्रज्ञानाची जोड मिळून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं म्हणून अनेक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता मदतीचा हात पुढे करणारं व्यक्तिमत्व असलेले केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून रा.जि. प. शाळा पाले उरण या शाळेला एक नवीन स्मार्ट टिव्ही संच देण्यात आला.




 ज्यामुळे त्या शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासासोबत इंटरनेटच्या द्वारे मनोरंजनातून विविध प्रकारच्या ज्ञानवर्धक गोष्टींची माहिती टिव्हीच्या माध्यमातून अभ्यासाच्या रूपाने प्रत्यक्ष पाहता येतील.त्यातून अनेक नवं - नवीन गोष्टी शिकता येतील.त्याच सोबत शाळेतील विद्यार्थ्याना वर्गात बसण्याकरिता चार सतरंजी ( चटई ) सुध्दा देण्यात आल्या.केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण भूषण राजू मुंबईकर यांच्या प्रयत्नातून रा.जि.प. शाळा पाले या शाळेला देण्यात आलेला नवीन स्मार्ट टिव्ही संच आणि सतरंज्या हे पाले गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते हनुमंत म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात येईल याच उदात्त भावनेतून देण्यात आले .या प्रेरणादायी कार्यक्रमाला केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोददादा पाटील,आगरी, कोळी , कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत,पाले गावचे सामाजिक कार्यकर्ते हनुमान म्हात्रे,पाले गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र म्हात्रे,शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता म्हात्रे,चैताली म्हात्रे आणि सर्व विद्यार्थी वर्ग आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने