उरण हि 2 (वार्ताहर ) आर्थिक क्षेत्रातील नामवंत व प्रसिद्ध असलेल्या मुथुट फिनकॉर्प तर्फे दरवर्षी विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवार दिनांक 2 ऑक्टोंम्बर 2023 रोजी दुपारी 12 वाजता मुथुट फिनकॉर्प तर्फे उरण नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, बॅच, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
25 स्वच्छता कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मुथूट फिन कॉर्प उरण ब्रँचचे मॅनेजर महेश लिंगायत यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुथुट फिनकॉर्पचे उरण ब्रँचचे बीझनेस डेव्हलोपमेंट ईकझीकेटीव्ह विठ्ठल ममताबादे यांनी मुथुट फिनकोर्पच्या प्रॉडक्ट विषयी माहिती दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, बॅच,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत मुथुट फिनकोर्पचे मॅनेजर महेश लिंगायत यांचे आभार मानले आहेत.
Tags
उरण