उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघ व सहायक निबंधक सहकारी संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने तेरापंथी हॉल वाणी आळी उरण शहर येथे इमारतींचा पुनर्विकास कन्व्हेन्स, डीम कन्व्हेन्स, सहकारी सोसाईटीतील व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबिरात महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील, तज्ञ संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ अविनाश चौधरी, प्रोफेसर चंदनशिवे उपस्थित होते
.यावेळी महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील म्हणाले महासंघाचे वतीने दरवर्षी उरण मधील गृहनिर्माण संस्था साठी प्रशिक्षण शिबीर घेत असतो आज उरण मधील गृहनिर्माण संस्था पुनर्विकास प्रक्रियेत आहेत ही गरज ओळखून आपण शिबीर घेतले आहे.उरण मधील गृहनिर्माण संस्था साठी त्यांच्या सोसाईटीत जाऊन विनामोबदला प्रशिक्षण घेण्याचा संकल्प केला आहे. गृहनिर्माण संस्थातील समस्या सोडवण्यासाठी महासंघ बांधील आहे असे सांगितले. यावेळी अविनाश चौधरी यांनी पुनर्विकास प्रक्रिया कशी राबवावी त्यात सभासद याचा सहभाग त्याच्या पायऱ्या समजून सांगितल्या. तर प्रोफेसर चंदनशिवें यांनी सोसायटीचे व्यवस्थापन कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्स याविषयी सविस्तर माहिती सांगितली
.तर पी एम सि बाबत आर्किटेक्ट राजेश खैरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ऍड एम ए घरत वकील झाल्याबद्दल महासंघाचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक सचिव सुभाष वाघ यांनी केले.यावेळी संचालक धनाजी पाटील, दामोदर केणी जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात 36 गृहनिर्माण संस्थांनी भाग घेतला.आभार प्रदर्शन संचालक दामोदर केणी यांनी केले.
Tags
उरण