उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) आपले सण - संस्कृती ,आपल्या रूढी परंपरा त्याच सोबत आपल्या पारंपरिक लोककला जपल्या गेल्या पाहिजे त्या जगल्या पाहिजेत आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचे जतन करणं फार गरजेचं आहे ! याच उद्दात भावनेतून सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक कार्याचा वारसा जतन करणारे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून आणि श्री साई देवस्थान साई नगर वहाळचे संस्थापक रविशेठ दादा पाटील यांच्या सहकार्यातून श्री साई नगर वहाळ येथे मंगळागौर व पारंपरिक फेर नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रायगडची शान पेण तालुक्याचा अभिमान कलर्स मराठी वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर ह्या नृत्यस्पर्धेची महाविजेती लावणी सम्राज्ञी आपली आगरी मुलगी नेहा पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या आयोजनातून आणि रवीशेठदादा पाटीलयांच्या सहकार्यातून साकारलेल्या या मंगळागौर व पारंपरिक फेर नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आगरी कोळी कराडी समाजातील सण - संस्कृती,परंपरा आणि लोककलेचं दर्शन साऱ्या जगाला कळावे सोबतच आगरी कोळी कराडी समाजातील महिला भगिनिंच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना योग्य असे व्यासपीठ मिळवून देण्याच्या तसेच त्यांच्यातील कला कौशल्यांचा विकास व्हावा हीच उद्दात भावना मनाशी बाळगून साकारलेल्या ह्या भव्य अश्या कार्यक्रमात स्पर्धक समूहांना स्पर्धेत सहभागी होण्याकरिता बापूजीदेव कलामंच कोप्रोलीचे संस्थापक डान्स कोरिओग्राफर अमृत म्हात्रे यांच्याशी संपर्क करून उरण,पनवेल,अलिबाग,खोपोली आणि आजूबाजूच्या परिसरातून एकूण १५ ( पंधरा ) महिला फेर नृत्यसमुहांनी आपला सहभाग नोंदविला होता
. या भव्य अश्या कार्यक्रमा करिता परीक्षक म्हणून लाभले होते ते स्टेप आर्ट डान्स अकॅडमी उरणचे संस्थापक सुप्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर पप्पूदादा सूर्यराव आणि शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे संस्थापक सुप्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर पपण पाटील यांनी परिक्षकांची उत्तम अशी भूमिका पार पाडत आपला नृत्य क्षेत्रातील दांडगा अनुभव पणाला लावत स्पर्धेतील प्रथम,द्वितीय,तृतीय,उत्त्तेजनार्थ ,बेस्ट डान्सर,बेस्ट ढोलकी वादक, बेस्ट गायक अश्या विविध स्पर्धकांना अगदी योग्य न्याय देत विजेते घोषित केले.या स्पर्धेेकरिता सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना कुठलीही प्रवेश फी न घेता विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण पंधरा पारंपरिक फेर नृत्य स्पर्धा समूहांतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ७,००० / रुपये विजेते ठरले ते आई गावदेवी चामुंडामाता शेडवली खोपोली तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ५,००० / रुपये देऊन मरूआई नाच मंडळ मोठीजुई यांना तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ३,००० / रुपये देऊन गौरी गणपती नाच मंडळ जोहे आणि श्री गणेश नाच मंडळ मोठीजुई यांना गौरविण्यात आले.
उत्तेजनार्थ सखी ग्रुप पनवेल आणि कुलदैवत मोठिजुई या दोन नृत्य समूहांना शाल श्रीफळ ,सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम १०००/ रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. बेस्ट डान्सर सखी ग्रुप पनवेल, बेस्ट ढोलकी वादक मरूआई नाच मंडळ मोठीजुई, बेस्ट गायक आई गावदेवी चामुंडामाता शेडवली खोपोली या स्पर्धकांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्हं देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. सोबतच या कार्यक्रमा करिता खास उपस्थिती दर्शविलेल्या आणि सध्या सर्वत्र गाजत असलेल्या सातबारा या आगरी गाण्याचे कलाकार उमेशदादा कोळी यांना सन्मानचिन्हं देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या ओघावत्या भाषा शैलीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध निवेदक रायगड भूषण नितेश पंडित यांनी केले .तर या कार्यक्रमा करिता सर्व स्पर्धक समूहांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्या करिता श्री बापूजी देव कलामंच कोप्रोली गावचे डान्स कोरिओग्राफर अमृत म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमा करिता विशेष मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली होती ती श्री साई देवस्थान साई नगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ दादा पाटील,पार्वतीताई पाटील ( माजी रा.जि.प. सदस्या वहाळ ),केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,राणीताई मुंबईकर,शिरीष कडू,मढवी गुरुजी, स्नेहल पालकर ( अध्यक्ष - केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था ),सुनिल वर्तक (अध्यक्ष गोवठणे विकास मंच), अनिल घरत ( उरण तालुका सचिव - आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था ),जिवन डाकी( सुप्रसिद्ध निवेदक,समालोचक ), श्याम ठाकुर ( सुप्रसिद्ध निवेदक समालोचक),विलास ठाकूर ( सल्लागार - कॉन संस्था )अरविंद पाटील ( सामाजिक कार्यकर्ते कासु मोरा),संपेश पाटील ( अध्यक्ष - मित्र परिवार ),नितेश मुंबईकर,रोहित पाटील,अमित जोशी,प्रियांका जोशी,वैष्णवी मुंबईकर ,प्रतिक्षा म्हात्रे,स्नेहाताई पाटील आणि विविध ठिकाणाहून आलेल्या स्पर्धक महीलाभगिनी त्यांचे पाठीराखे विविध क्षेत्रातील कलाकार मंडळी मान्यवर पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीत हा भव्य अश्या प्रकारचा मंगळागौरी व पारंपरिक फेर नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम सोहळा अगदी मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
Tags
उरण