सारडे येथे मोफत आधार कार्ड अपडेट कॅम्पचे आयोजन


सारडे येथे मोफत आधार कार्ड अपडेट कॅम्पचे आयोजन


उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )
शुक्रवार दिनांक 13/10/2023 रोजी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट - नवी मुंबई डिविजन व ग्रामपंचायत सारडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आधार कार्ड अपडेशन कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. सारडे गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांनी या कॅम्प मध्ये येऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घेतले. या वेळी कॅम्प साठी अमोल राऊत उप अधिक्षक वाशी सब डिवीज़न,डिपार्टमेंट ऑफ पोस्टचे अधिकारी सुनिल केशव पाटील,मनीष गोविंद नागावकर
पोस्टल असिस्टंट,सारडे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच रोशन पांडुरंग पाटील,उपसरपंच जीवन श्रीराम पाटील, सदस्य अमित नथुराम म्हात्रे, महेश भरत पाटील, अमीता सूनित पाटील, अस्मिता हिरामण म्हात्रे,प्रतिक्षा अजिंक्य पाटील, कामिनी गणेश पाटील,ग्रामसेविका संचिता केणी,शाळा मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे व शाळेतील उपशिक्षक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महेश मनिराम पाटील व सत्यवान बाळकृष्ण पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले.ग्रामीण भागात आधार कॅम्पचे आयोजन केल्याने ग्रामस्थांनी, जनतेनी सारडे ग्रामपंचायतचे सरपंच रोशन पाटील व ग्रामपंचायत सदस्यांचे तसेच पोस्ट ऑफिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने