उरण दि. १६(विठ्ठल ममताबादे ) बालई - काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या मूळ गावठाण २ एकर तसेच विस्तारीत गावठाण १२० एकर एकूण १२२ एकर वरील एकूण ११११ (एक हजार एकशे अकरा), लोकसंख्या - २६९७ या गावठाण प्रस्तावासाठी उरणचे तहसीलदार उध्दव कदम यांनी तात्काळ पंचनामे करावेत.१५ दिवसाच्या आत हा प्रश्न सोडवावा अन्यथा लोकांच्या संविधानिक हक्कासाठी उरण तहसिल कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र पांडुरंग चव्हाण यांनी पत्रव्यवहाराद्वारे प्रशासनाला दिला आहे.
गावठाण विस्ताराच्या बाबतीत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाने लागलेल्या जनसुनावणीत मा. जिल्हाधिकारी म्हसे यांच्या समोर मा. तहसिलदार पनवेल आणि मा. प्रांताधिकारी पनवेल यांनी मान्य केले की, मागील ७० वर्षात महसूल विभाग उरण-पनवेल (रायगड) यांनी एकाही गावचा गावठाण प्रस्ताव मान्य केलेला नाही. अर्थात उरण तहसिल आणि एकूणच कोकणच्या महसूल विभागाचे हे ऐतिहासिक अपयश आहे. याचा प्रचंड त्रास येथल्या आगरी, कोळी, कराडी, ओबीसी, (एससी), (एसटी) मागासवर्गीय समाजाला भोगावा लागत आहे.९५ गावांतील शेतकऱ्यांनी नवी मुंबई शहरासाठी आपल्या मालकीच्या १०० टक्के शेतजमिनी सिडको शासनास दिल्या असताना एकही गावाचे नियोजन न करणाऱ्या सिडको शासनाचे प्रचंड अपयश आहे.मूळ २ एकर गावठाणाबाहेर वाढलेल्या १२० एकर जागेतील घरांवर सिडकोने अतिक्रमीत असा शेरा मारणे हे उरणच्या तहसिलदारांनी येथे वाढलेल्या घरांच्या महसूली नोंदी न घेण्याच्या महसुली चुकांच्या दाखला आहे
.येत्या पंधरा दिवसात आमच्या घरांचे पंचनामे आपल्या कार्यालयाकडून न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बालई-काळाधोंडा गावठाण विकास परिषदेमार्फत करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र पांडुरंग चव्हाण यांनी प्रशासनाच्या सर्व विभागांना दिला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, महसूलमंत्री, मंत्रालय सचिव,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,तहसील कार्यालय उरण, उरण पोलीस ठाणे आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून गावठाण प्रस्तावासाठी त्वरित १५ दिवसाच्या आत पंचनामे करण्यात यावेत अन्यथा बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या वतीने उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
Tags
उरण