दुहेरी कर विरोधातील लढ्यासाठी कामोठेकर एकवटलेदुहेरी कर विरोधातील लढ्यासाठी कामोठेकर एकवटले

 *पाच वर्षाचा कर माफ करायचा अधिकार असताना देखील भाजप सत्ताधारी ठाकूर बंधूनी कोणतीही भूमिका घेतली नाही* 

 *पनवेल करांनी दुहेरी कर न भरून चालू ठेवलेल्या असहकार आंदोलन असेच पुढे चालू ठेवून त्याची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी कामोठे करांचा निर्धार* पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या दुहेरी कराच्या विरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेने यशस्वीपणे चालू ठेवलेल्या लढ्याला आज एकता सामाजिक संस्थानेही पुढाकार घेऊन बळ दिले. या संस्थेने आज कामोठे येथे आयोजित केलेल्या सभेला कामोठेकरांनी प्रचंड प्रतिसाद देत ही लढाई अधिक आक्रमक करण्याचा निर्धार केला. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या व्यासपिठावरून महानगरपालिकेने लादलेल्या या जाचक, जूलमी दुहेरी करांचा भरणा न करीत पनवेलकरांनी चालू ठेवलेले हे असहकार आंदोलन अशाचप्रकारे प्रत्येक घराघरात पोहचवण्याचाही निर्धार समस्त कामोठेकरांनी या सभेत केला.मा. उच्च न्यायालयातही परिवर्तन सामाजिक संस्थेचे श्री. महादेव वाघमारे व अॕड. विजय कुर्ले हे या प्रकरणी आक्रमकपणे पाठपूरावा करीत असल्यामूळे सर्व प्रस्थापित सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या प्रशासनाचा अशाप्रकारे जबरदस्ती करवसुलीचे प्रकरण उद्या अंगाशी येऊन सत्ताधारी तोंडघशी पडण्याची भिती वाटत असल्याने एक-दोन वर्षांचा कर माफ करणार असल्याच्या अफवाही हे सत्ताधारी पनवेलकरांमध्ये पसरवत आहेत.
जेणेकरून पनवेलकरांमध्ये या प्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेला प्रचंड राग कमी होईल व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या व्यासपिठावरून पनवेलकरांनी उभारलेल्या असहकार आंदोलनामूळे मजबूर होऊन घ्याव्या लागणार्या निर्णयाचे श्रेयही त्यांना घेता येईल.

परंतू अशाप्रकारे कितीही अफवा पसरवून पनवेलाकरांना सत्ताधारी भ्रमित करून पून्हा मतदारांसमोर येण्याचा प्रयत्न केला तरी पनवेलकर सत्ताधाऱ्यांना आता पून्हा आता महानगरपालिका सभागृहात प्रवेश देणार नाहीत असा निश्चय आजच्या या सभेत केला गेला.
एकता सामाजिक संस्थेने या सभेचे आयोजन केले होते प्रमुख उपस्थिती ऍड विजय कुर्ले, ऍड शिवराज कुंचगे उच्च न्यायालय,याचिकाकर्ते महादेव वाघमारे तसेचकामोठे रहिवाशी संघ,जय हरी महिला मंडळ,परिवर्तन युवा मंच,श्री. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर 21,स्वराज प्रतिष्ठान रायगडचा गणराज,आई भवानी मित्र मंडळ, सेक्टर 12,आई भवानी महिला मंडळ, सेक्टर 12 या संस्थांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल शितोळे, अल्पेश माने, गौरव पोरवाल, पोपट आवारी, सुरेश खरात, संगीता राऊत, संगीता पवार, हरीश बाबरीया बाळासाहेब सकपाळ आदींनी परिश्रम घेतले तसेच डॉ. दशरथ माने यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने उपस्थितांचे मन जिंकले.


थोडे नवीन जरा जुने