शिवा संघटनेची केंद्रीय ओबीसी आयोगापुढे मुंबईत सुनावणी संपन्न

शिवा संघटनेची केंद्रीय ओबीसी आयोगापुढे मुंबईत सुनावणी संपन्नउरण दि १८(विठ्ठल ममताबादे )दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री विश्रामगगृह मुबंई येथे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नवी दिल्लीचे अध्यक्ष हंसराज भय्या अहिर यांच्या अध्यक्षतेखाली शिवा संघटनेच्या ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी संपन्न झाली.या सुनावणीत वीरशैव-लिंगायत समाजातील लिंगायत वाणी जातीसह एकूण १५ उपजातीचा केंद्रीय ओबीसी लिस्ट मध्ये समावेश करण्यासाठी प्रा. मनोहर धोंडे यांनी आयोगापुढे मांडणी केली.या सुनावणीत केंद्रीय ओबीसी आयोगाचे प्रधान सचिव राजीव रंजन, सदस्य भुवन भूषण कमल, केंद्रीय आयोगाचे आर्चीव्हस राजेश कुमार, राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, राज्य शासनाचे इतर मागास वर्ग विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्र सिंह, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव श्री झाल्टे, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऍडव्होकेट बी. एल. सगर किल्लारीकर, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम, ज्योतीराम चव्हाण, सदस्य सचिव श्रीमती आ. उ. पाटील यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

या सुनावणीत वीरशैव - लिंगायत समाजातील एकूण १५ जातींचा केंद्रीय ओबीसी लिस्ट मध्ये समावेश करण्यासाठी शिवा संघटनेकडून बाजू मांडण्यात आली. ज्या उपजातींचा समावेश करण्यासाठी मांडणी करण्यात आली त्या उपजाती लिंगायात वाणी, लिंगायत जंगम, लिंगायत गुरव, लिंगायत तांबोळी, लिंगायत कुंभार, लिंगायत न्हावी, लिंगायत परीट, लिंगायत धोबी, लिंगायत फुलारी, लिंगायत सुतार, लिंगायत कुल्लेकडगी, लिंगायत कोष्टी, लिंगायत देवांग व लिंगायत साळी या उपजातींचा समावेश करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री विश्रामग्रह मुंबई येथे केंद्रीय आयोगापुढे सुनावणी दरम्यान आयोगापुढे बाजू मांडताना
 शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या सह राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतप्पा शेट्टे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.वाय.बी सोनटक्के, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, राज्य सरचिटणीस रुपेश होनराव, राज्य उपाध्यक्ष सुनील वाडकर, राज्य मुख्य संघटक नारायण कंकनवाडी, ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवा बिराजदार, पालघर जिल्हा अध्यक्ष शान्तेश्वर गुमते, लोहा (नांदेड ) तालुका अध्यक्ष हनुमंत लांडगे, पुणे शहर सचिव गौरव तक्ते, सरपंच बसवेश्वर धोंडे, सरपंच दामोदर वाके यासह पधादिकारी उपस्थित होते.शिवा संघटनेची बाजू एकूण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नवी दिल्लीचे अध्यक्ष हंसराज भय्या अहिर व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे पदाधिकारी यांनी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या मागणीला व पत्रव्यवहारांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या प्रयत्नामुळे लवकरच १५ उपजातींचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना प्रयत्नशील असल्याचे प्रा. मनोहर धोंडे यांनी यावेळी सांगितले.थोडे नवीन जरा जुने