दिनेश तांडेल यांनी स्व खर्चानी केली मैदानाची साफसफाई.







दिनेश तांडेल यांनी स्व खर्चानी केली मैदानाची साफसफाई.



उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
सिध्दीविनायक म्हटले कि एकच गावचे नाव उरण मध्ये येते ते म्हणजे सोनारी. आणी सोनारी म्हटले कि क्रिकेटची पंढरी. सोनारी गावाने आज पर्यंत अनेक महान क्रिकेटर बनवले आहे. किशोर कडू, जितेंद्र कडू (जितू ),जयेंद्र कडू, आदेश कडू, संदीप पाटील (पप्पू )असे अनेक रायगडमध्ये नावाजलेले क्रिकेटर बनवले आहेत.मात्र सोनारी गावच्या मैदानात कचरा झाले होते. खेळाडूंना व्यवस्थित खेळता येत नव्हते. खेळाचा नीट सरावही करता येत नव्हता ही समस्या लक्षात आल्यानंतर सोनारी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश तांडेल यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला





.सोनारी गावाच्या मैदानाची साफ सफाई सोनारी गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष दिनेश रमण तांडेल यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्व खर्चाने केली. दिनेश तांडेल यांनी हि सेवा केल्या बद्दल संपूर्ण सोनारी गावाचे सर्व क्रिकेट खेळाडू यांनी आनंद व्यक्त केले आहे.तसेच फ्रेंड्स 11 सोनारी 40+मास्टरचे कर्णधार मधुकर कडू यांनी दिनेश तांडेल यांनी स्वखर्चाने मैदानाची साफ सफाई केल्या बद्दल संघाच्या वतीने आभार मानले आहेत.स्व खर्चातून मैदानाची साफसफाई केल्याने सर्व खेळाडूमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खेळाडूंना आता क्रिकेट खेळ खेळण्यासाठी उत्तम व स्वच्छ मैदान मिळाल्याने खेळाडूंना या मैदानावर क्रिकेटचा उत्तम सराव करता येणार आहे.


थोडे नवीन जरा जुने