गोरख रामदास ठाकूर व मित्रपरिवार आणि खोपटे भाजपाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन.
 उरण दि. 1 (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर व मित्र परिवार आणि भारतीय जनता पार्टी खोपटेच्या वतीने शनिवार दि 7 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद शाळा खोपटे, ता.उरण,जि. रायगड येथे उरण तालुक्यातील बेरोजगार युवक युवतीसाठी भव्य दिव्य असे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार असून , मुख्य अतिथी म्हणून लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पवार तर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविंद्र पाटील यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.या मेळाव्यात 25 ते 30 नामांकित कंपन्याचा समावेश आहे. मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल सेल्स व मार्केटिंग, बँकिंग इन्शुरन्स हॉस्पीटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकॉम व इतर आय.टी,बीपीओ, केपीओ, फार्मा आदी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून 8 वी ते एम ए, इंजिनिअर पर्यंतच्या तसेच डिप्लोमा डिग्री धारक, तसेच आयटीआय केलेल्या विदयार्थ्यांना या रोजगार मेळाव्यात रोजगार उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येक बेरोजगार युवकांना नोंदणी अर्ज देण्यात येत आहे. ते नोंदणी अर्ज व सोबत बायोडाटा एकत्र जोडून रोजगार मेळाव्यात मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोरख रामदास ठाकूर व मित्रपरिवार आणि खोपटे भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे. बेरोजगारांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी साहिल म्हात्रे -8879426163,भूपेंद्र ठाकूर - 9769227878,संकेत भगत- 989 2 102136,अक्षय ठाकूर - 96 6 4 2 5 6 4 74 यांच्याशी संपर्क साधावे.


थोडे नवीन जरा जुने