उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )उरण मधल्या आगरी, कोळी, कराडी, चर्मकार, मुस्लिम या मागासवर्गीय अल्पसंख्यांक समाजाच्या ५० ते ६० वर्षाच्या दुकाने, घरे यांच्या विरोधात सरकारने तोडक मोहिम उघडल्याचे दिसून येत आहे. उरण रेल्वे स्टेशन समोरच्या मोक्याच्या जागेवर कालच सिडकोने कारवाई केल्यानंतर उरणकर एकवटले आणि या कारवाईला स्थगिती मिळाली. याचबरोबर उरण शहराच्या वैष्णवी हॉटेल एनएमएमटी स्टॉप या उरण नगरपरिषद परिसरातील ५० ते ६० वर्षे जुन्या दुकानांना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस लावल्या आहेत.
चव्हाण चप्पल शॉप या अत्यंत जुन्या दुकानालाही नोटीस लावून समस्त मागासवर्गीय उद्योजकांच्या मागे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार लागल्याचे दिसून येतेय.चर्मकार समाजाचे रविंद्र पांडुरंग चव्हाण, जितेंद्र पांडुरंग चव्हाण यांचे दिवंगत वडील पांडुरंग रामा चव्हाण यांच्या नावे हे पारंपारिक दुकान आहे. सरकारी जागेत मागील ४० वर्षे अगोदर पासून असलेले हे दुकान एडव्हर्स पझेशन, ताबा कब्जा वहिवाटी नुसार मालकिचे आहे. ग्रामपंचायत ने नगरपरिषद यांच्यामध्ये मागासवर्गीयांची घरे, दुकाने यांच्या नोंद घेऊन त्यांचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचे अनेक कायदे असून ही ओबीसी/एससी/एसटी यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात उरण नगरपरिषद, भूमी अभिलेख विभाग, तहसिलदार हे सातत्याने अपयशी ठरतेय याचा अर्थ आपला देशात आजी मनुस्मृतीचे कायदे आहेत, असे नागरिकांचे मत तयार होत आहे.
२०१७ ते २०२३ चा सातत्यपूर्ण पत्रव्यवहार चव्हाण कुटूंबीयांनी मा. मुख्यमंत्री ते तहसिलदार नगरपरिषद यांच्याकडे केला आहे.नव्याने दि. २५-१०-२०२३ रोजी नोटीस प्राप्त होताच मंत्रालय ते जिल्हाधिकारी, उरण नगरपरिषद स्थानिक आमदार केंद्रीय अनुसूचित जमाती आयोग यांनाही कळविण्यात आले आहे.न्यायालयामार्फतही या दुकानाची नोंद घेतल्याचे पुरावे सोबत जोडले आहेत. एवढे सारे करुनही तोडक कारवाई झाल्यास याच जागेत समस्त चर्मकार बांधवांच्या संघटनेसह चव्हाण परिवार याच जागेत आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र मा. मुख्यमंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना रविंद्र पांडुरंग चव्हाण, जितेंद्र पांडुरंग चव्हाण यांनी दिले आहे.
Tags
उरण