उरण मधील सर्व नियम आणि सेफ्टी नियम झुगारून बसलेले रेसिडेन्शियल झोन मधील अनधिकृत भंगाराचे दुकान व गोडाऊन वर कारवाई करण्याची आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांची मागणी.






उरण मधील सर्व नियम आणि सेफ्टी नियम झुगारून बसलेले रेसिडेन्शियल झोन मधील अनधिकृत भंगाराचे दुकान व गोडाऊन वर कारवाई करण्याची आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांची मागणी.





उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील बोरी गावातील स्मशानभूमी जवळील रमजान शेठ (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या रेल्वे व कस्टम या सरकारी जागेवर असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला २७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता भीषण आग लागली होती. या आगीचे स्वरूप तीव्र असल्यामुळे ७० ते ८० फायरबिग्रेडच्या गाड्या लागून, २४ तास होऊन हि आग धुमसत होती. ज्यावेळी आग लागली तेव्हा हवेची दिशा उत्तरेकडे होती. उत्तरेकडे असलेले दोन मजली घराचे सुमारे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाले आहे. या भंगारवाला रमजान शेठ याच्या अनधिकृत भंगाराच्या गोडाऊन ला लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या घर मालक परेश तेरडे व त्यांच्या कुटूंबियांची आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने परेश तेरडे यांना आर्थिक मदत तसेच भंगारवाला रमजान शेठ यांच्या कडून नुकसान भरपाई मिळून देणे बाबत विनंती करण्यात येत आहे.अशा प्रकारे रेसिडेन्सियल एरिया मध्ये सरकारच्या जागेत अतिक्रमण करून १० ते १२ भंगाराची दुकाने व गोडाऊन उरण बोरी स्मशानभूच्या आजूबाजूला थाटली आहे. हि भंगाराची दुकाने व गोडाऊन ओएनजीसी पाईप लाईन वरती व हायटेंशन विद्युत लाईन खाली आहेत. हि दुकाने व गोदामे सरकारी जागेवरती वसलेली आहे. या गोडाऊन मध्ये सुद्धा आग लागलेल्या गोडाऊन प्रमाणे थरावर थर लावून भंगार ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हायटेंशन विदुत लाईनला भंगार टेकत असून पुन्हा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या भंगारवाल्यांचे कामगार व कुटूंब तेथेच राहतात त्यामुळे त्यांना स्वयंपाक करण्यासाठी तेथेच चूल किंवा गॅसचा उपयोग करण्यात येत आहे.त्यामुळे भविष्यात होणारी जीवितहानी व गंभीर समस्या लक्षात घेउन उरण मधील सर्व नियम आणि सेफ्टी नियम झुगारून बसलेले रेसिडेन्शियल झोन मधील अनधिकृत भंगाराचे दुकान व गोडाऊन वर कारवाई करण्याची मागणी आरपीआयचे(आठवले गटाचे )उरण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे.





या भागातच दुकानांमध्ये वेल्डिंग करण्यासाठी लागणारे सिलेंडर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुले तिथेही अशी घटना घडण्याची शक्यता आहे.हा भंगार उरण मध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कंपन्या आहेत यातून कचऱ्याचा नावाने भंगार बाहेर काढून या भंगारवाल्यांना विकला जातो. कंपनीतून काढलेल्या भंगारात केमिकल चे प्लॅटिक चे ड्रम सुद्धा असताना याची माहिती या भंगारवाल्याना नसते. त्यामुळे हा केमिकल युक्त भंगार रेसिडेन्सियल एरियामध्ये वसलेल्या गोडाऊन मध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भंगार मध्ये आलेले केबल मधील तांबा, एलुमिनियम काढण्याकरिता केबल गोडाऊनमध्येच जाळण्यात येत आहे. त्याचा व केमिकल युक्त ड्रमचा व धुराचा गोडाऊनचा शेजारील रहिवासी यांना त्यामुळे श्वसनाचे त्रास होत आहेत. याबाबत तेथील रहिवासी नागरिकांनी व उरण तालुका मराठी पत्रकार संघाने याबाबत संबंधित प्रश्नाबाबत तक्रार सुद्धा केली आहे. तरी सुद्धा या अनधिकृत भंगारवाल्यांवर कारवाई होत नाही. त्यांचे साठेलोठे काही शासकीय अधिकाऱ्यांसोबत असल्याने त्यांचा वर कोणत्याही प्रकारची कारवाही होत नाही. उरण तालुक्यात चारफाटा, चाणजे विभाग, करंजा, पागोटे, चिरनेर, भेंडखळ, धुतूम, द्रोणागिरी नोड, सोनारी , करळ , जेएनपीटी एरिया, ज्या ठिकाणी छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांचा लगत हि भंगार ची दुकाने थाटली आहे. यांवर जिल्हा अधिकारी रायगड व पोलीस आयुक्त नवी मुंबई व नगरपालिका, ग्रामपंचायती यांनी या अनधिकृत सरकारी जागेत बसलेल्या रहिवासी असलेल्या भंगारवाल्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. सदर हि दुकाने सरकारला हवी असल्यास त्यांनी त्यांना नागरिकांचा रहिवासी झोन पासून दूर ठेऊन तशाप्रकारचे त्यांचा दुकानाची व्यवस्था करावी. अन्यथा २७ ऑक्टोबर २०२३ रोजी लागलेल्या भंगाराच्या गोडाऊनला लागलेली आगीचे प्रकार सतत होईल.असे संजय गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.



२७ ऑक्टोबर २०२३ रोजी भंगाराच्या गोडाऊन लागलेली आग तिची त्यावेळी हवेची दिशा पश्चिमेला होती. त्यामुळे एका घराचे नुकसान झाले. जर दुर्देवाने यावेळी हवेची दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला असती तर सुमारे २०० घर जळून जीवितहानी होण्याची शक्यता होती.याबाबत स्थानिक स्तरातून संबंधित प्रशासनाकडून या अनधिकृत भंगाराच्या दुकान व गोडाउनवर उरणचे नागरिकांचे जीव व आरोग्य लक्षात घेऊन महाष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व शासकीय यंत्रना,जिल्हा अधिकारी रायगड, पोलीस आयुक्त नवी मुंबई, नगरपालिका, व ग्रामपंचायत यांनी जातीने लक्ष देऊन उरण मधील अनधिकृत भंगारवाल्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आठवले गटाचे )उरण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, गृहमंत्री), अजित दादा पवार (उपमुख्यमंत्री), उदय सामंत (पालकमंत्री रायगड), जिल्हाधिकारी रायगड, पोलीस आयुक्त नवी मुंबई (बेलापूर), उपविभागीय अधिकारी (पनवेल), पोलीस उपायुक्त (पनवेल), सहाय्यक पोलीस आयुक्त (न्हावा शेवा), राज्य पोलीस तक्रार प्राधीकरण (मुंबई २१), महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, (सी.बी.डी. बेलापूर), तहसीलदार (उरण), वरिष्ठ पोलीस निरीक्षक (उरण), वरिष्ठ पोलीस निरीक्षक (न्हावा शेवा), वरिष्ठ पोलीस निरीक्षक (मोरा),मुख्याधिकारी (उरण नगरपालिका), गटविकास अधिकारी (उरण ), सीजीएम , (ओएनजीसी उरण प्लांट), संजय सेठी, (जेएनपीए चेअरमन न्हावा शेवा),सर्व पत्रकार व संपादक यांच्याकडे पत्रव्यहाराद्वारे केली आहे.


थोडे नवीन जरा जुने