बाबासाहेब लिगल पँथर ची पनवेल विभागातील वेगवेगळ्या कार्यक्रमांस भेट.BABASAHEB"S LEGAL PANTHAR ची पनवेल विभागातील वेगवेगळ्या कार्यक्रमांस भेट.

पनवेल दि. 29/10/23 *बाबासाहेब लिगल पँथर (Babasabeb's Legal Panther), कायदेशीर गणरक्षक फौज (K.G.F.)* *(कार्यक्षेत्र- महाराष्ट्र राज्य)* पँथर चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रफुल पंडीत भोसले व ॲडव्होकेट निलमताई प्रफुल्ल भोसले यांनी विभागातील वेगवगळ्या सामजिक तसेच राजकीय कार्यक्रमास आपल्या सहकारी व पदाधिकार्यान सोबत भेटी दिल्या.


भरतीय बौद्ध महासभा शाखा क्र. 16, तक्षशीला बुद्ध विहार कमिटी सुकापुर व बौद्धजन पंचायत शाखा क्र. 796 येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वंचित बहुजन आघाडी सुकापुर येथील शाखा उदघाटन व लोकार्पन सोहळ्यास उपस्थीत राहुन वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्या दिल्या. व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमास विविध सामजिक, राजकीय क्षेत्रांतील नेते व पदाधिकारी उपस्थीत होते. तसेच सायंकाळी बौद्धजन पंचायत शाखा क्र.796 च्या वतीने आयोजित 67 वे धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास समाप्ती कार्यक्रमास उपस्थित राहुन बाबासाहेब लिगल पँथर संघटने विषयी माहिती दिली.आणि येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून सर्व समाजातील शोषित, वंचित व दुर्लक्षित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे संगितले.


         कार्यक्रमास बौद्धजन पंचायत शाखा क्र 796 व शाखा क्र.735 मधिल पदाधिकारी व कर्यकर्तें स्थनिक रहिवासी मोठया संखेने उपस्थीत होते. बाबासाहेब लिगल पँथर चे सचिव शशिकांत सातपुते, समन्वयक कृनाल कदम, निवेदन देठे, प्रशांत भोसले, सतिश कर्डक, सोनाल देठे , पौर्णिमा बेबले, तसेच भरतीय बौद्ध महासभा शाखा क्र.15 चे खजिनदार जितेंद्र जावळे साहेब, प्रथमेश गमरे, महेंद्र पेंडूरकर, ॲडव्होकेट संदीप साळवी. सोनवणे साहेब, शिंदे साहेब, मोहिते साहेब आदी मान्यवर उपस्थीत होते.


थोडे नवीन जरा जुने