कळंबुसरे ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचार विरोधात ग्रामपंचायत सदस्यांचे कोकण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन





कळंबुसरे ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचार विरोधात ग्रामपंचायत सदस्यांचे कोकण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन 




 उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी व लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी नाईक, स्वप्नाली पाटील यांनी कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण,मुख्य कार्य कारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद,नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर आदि ठिकाणी पत्रव्यवहार करून केली होती. मात्र शांततेच्या व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा कळंबुसरे ग्रामपंचायती मधील श्रष्टाचाराला चाप बसत नसल्याने तसेच संबधित भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने कळंबुसरे ग्रामपंचायतचे सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी तळीराम नाईक, स्वप्नाली महेश पाटील हे सोमवार दि. ३० ऑक्टोंबर २०२३ पासून कोकण आयुक्त कार्यालय, कोकण भवन बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.आज दिनांक ३०/१०/२०२३ रोजी बेमुदत आंदोलनाचा पहिला दिवस आहे.









थोडे नवीन जरा जुने