उरण शहर झाले स्वच्छ व सुंदर
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात दर महिन्याला स्वच्छता अभियान राबविण्यात येते. मागील महिन्या प्रमाणे सध्या चालू असलेल्या ऑक्टोबर महिन्यात सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात आले
.दिनांक २७/१०/२०२३ रोजी उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सदर अभियानात उरण शहरातील तहसील कार्यालय परिसर ते मशीद मोहल्ला ते महात्मा गांधी पुतळा परिसरात स्वछता अभियान घेण्यात आले . सदर अभियानात एकूण २ टन कचरा उचलण्यात आला. तहसीलदार उद्धव कदम तसेच उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखापाल सुरेश पोसतांडेल, बांधकाम अभियंता झुंबर माने , आरोग्य निरीक्षक हरेश तेजी , प्रशाशकीय अधिकारी अनिल जगधानी, कर निरीक्षक संजय डापसे,
प्रसाद मांडेलकर यांच्या श्रमदानातून स्वछता अभियान पार पडले. तसेच उरण नगर परिषद शाळा क्र १,२,३ चे शिक्षक तसेच विद्यार्थी, माय नॉलेज चे विद्यार्थी यांनी सदर अभियानात भाग घेऊन श्रमदान केले . सदर स्वच्छता अभियान दर महिन्याला होत असल्याने उरण शहर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे .
Tags
उरण