रिस प्राथमिक आरोग्य केंद्रास संग्राम तोगरे यांनी दिली औषधे दान









रिस प्राथमिक आरोग्य केंद्रास संग्राम तोगरे यांनी दिली औषधे दान


उरण दि २८( विठ्ठल ममताबादे) उरण मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संग्राम तोगरे व सुमनताई संग्राम तोगरे हे दांपत्य अनेक वर्षापासून गोरगरिबांना, विविध सामाजिक संस्था, शासकीय रुग्णालये येथे औषधे मोफत दान करत आहेत. तेही कोणतेही मोबदला न घेता. निस्वार्थ वृत्तीने त्यांचे हे औषधे दान करण्याचे समाजकार्य अखंडितपणे अविरतपणे आजही सुरू आहे.



 आजपर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून अंदाजे १ करोड ६५ लाख,३७ हजार ३०० रुपयांची औषधे रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध सामाजिक संस्था यांना मोफत दिली आहेत. उतरत्या वयात न थकता, न डगमगता त्यांनी हे काम सुरूच ठेवले आहे.२९५ प्रकारची किंमत अंदाजे १,८०,०००/- (एक लाख ऐंशी हजार ) रूपयांची औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र, रीस ( लोहोप),ता .खालापूर, जि.रायगड येथे डॉक्टर नयन एस. परब , परिचारिका माधुरी एम. म्हात्रे तशेच सायली एस.साळुंखे आणि सुमनताई तोगरे यांच्या उपस्थितीत




 जेष्ठ समाजसेवक संग्राम आर.तोगरे यांनी दान केले.ही महत्वाची व उपयोगी औषधे मिळताच डॉक्टर नयन परब यांनी जेष्ठ समाजसेवक संग्राम तोगरे, सुमन तोगरे यांचे मनापासून आभार मानले.या औषधांचा समाजातील सर्वच घटकांना लाभ मिळणार असल्यामुळे या औषधामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. औषधांचा तुटवडा झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या नांदेड शासकीय रुग्णालयात अनेकांचा बळी गेला. मात्र रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना गोळया औषधे कमी पडू नये यासाठी गेले २० वर्षाहून जास्त काळ तोगरे कुटुंबीय यांचे मोफत औषध गोळया वाटपचे समाजसेवेचे कार्य निश्चितच वाखाणन्याजोगे आहे.


थोडे नवीन जरा जुने