उरण दि १(विठ्ठल ममताबादे )
मा.पंतप्रधान यांनी दिलेल्या सुचनेनुसार दिनांक ०१/१०/२०२३ रोजी घारापुरी बेटावरील लेण्यांकडे जाणारा रस्ता व एलिफंटा लेणी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सदरचे उपक्रमासाठी इम्पोर्ट - एक्सपोर्ट बॅक ऑफ इंडिया मुंबई शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कस्टम्स जेएनपीए विभागातील अधिकारी व कर्मचारी,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्या, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
बेटावर आलेल्या अधिका-यांचे ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने स्वागत करण्यात आले.
Tags
उरण