स्वर्गीय जे.पी म्हात्रे यांच्या शोकसभेत जे. पी. म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा.


.


शोकसभेत पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू.



उरण दि 1(विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील शिवसेनेचे कट्टर एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे नविन शेवा गावचे सुपत्र,माजी सरपंच तथा शिवसेनेचे विद्यमान तालुका संपर्क प्रमुख पदावर कार्यरत असलेले जे.पी. म्हात्रे यांचे शुक्रवार दि 22/09/2023 रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. या निधनामुळे शिवसेना पक्षात, इतर राजकीय पक्षात मध्ये तसेच उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली होती. जे. पी. म्हात्रे (जनार्दन पांडुरंग म्हात्रे) हे शिवसेना शाखा नविन शेवेचे संस्थापक होते. 20 वर्षे सरपंच तर 5 वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी पद भूषविले. 18 गाव जेएनपीटी प्रकल्पग्रस्त बाधित सरपंच कमिटीचे ते अध्यक्ष होते सध्या ते शिवसेना उरण तालुका संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते




. गावातील बेरोजगारांना काम देण्यासाठी त्यांनी श्री शांतेश्वरी प्रकल्पग्रस्त मजूर सहकारी सोसायटीची स्थापना करून शेकडो पुरुष महिलांना सोसायटी मध्ये काम दिले . अशा प्रकारे, विविध पदावर कार्यरत राहून गोर गरिबांना न्याय देणारे सर्वसामान्य व्यक्तीमत्व असल्याने ते आजही सर्वांच्या मनात घर करून आहेत असे मत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केले.शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते जे. पी. म्हात्रे यांच्या शोकसभेचे आयोजन शनिवार दि 30 सप्टेंबर 2023 रोजी नविन शेवा येथे करण्यात आले होते.त्यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी जे. पी. म्हात्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेनेचे रायगड उप जिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकुर, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील,दैनिक वाळवाराचे संपादक विजय कडू,उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शाखा प्रमुख जगजीवन भोईर,तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा घरत, न्हावाचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, 




महादेव घरत, मनोज पाटील, जयवंत पाटील, ममता पाटील, प्रकाश घरत , निशांत घरत, नरेश मोकाशी आदी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त करत स्वर्गीय जे. पी म्हात्रे यांना भावपूर्ण श्रदांजली अर्पण केली. यावेळी कमळाकर पाटील, सुरेश वास्कर, जेष्ठ पत्रकार दिलीप कडू, घनश्याम कडू, संदेश पाटील, एस के पुरो, सरपंच सोनल घरत, उपसरपंच कुंदन भोईर, शैलेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले.तर काहीजणांना अश्रू अनावर झाले. स्वर्गीय जे. पी. म्हात्रे यांच्या आठवणीने कंठ दाटून आला. यावेळी द्रोणागिरी शहर शाखेचे प्रमुख जगजीवन भोईर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवसेनेचा वसा, संस्कार असाच पुढे नेउन जे. पी. म्हात्रे यांचे कार्य, विचारसरणींना उजाळा देऊन त्यांचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवूया आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल असे जगजीवन भोईर यांनी सांगितले. यावेळी त्यानी जे. पी. म्हात्रे यांच्या सोबत घालविलेल्या आठवनींना जगजीवन भोईर यांनी उजाळा दिला. शेवटी दुःखद मनाने, जड अंतकरणाने ही शोकसभा पार पडली. या शोकसभेला शिवसेनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते , नविन शेवेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने