दरोडा व जबरी चोरी करणार्‍या टोळीतील मुख्य आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी सापळा रचून केली अटक

दरोडा व जबरी चोरी करणार्‍या टोळीतील मुख्य आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी सापळा रचून केली अटक
पनवेेल, दि.7 (संजय कदम) ः मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा व जबरी चोरी करणार्‍या टोळीतील मुख्य आरोपीला ठाणे येथे सापळा रचून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा अनेक गुन्ह्यासाठी पोलिसांनी हवा होता. गेल्या दोन वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता.दयाशकर् जगदीश नारायण मिश्रा हे त्यांचे ताब्यातील ट्रकने पुणे ते जेएनपीटी असा वाहतुक प्रवास करीत असतांना पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवे, पनवेल एक्झीट जवळ, रस्त्यालगत ट्रक उभा करून हे लघूशंके करीता खाली उतरले असता 4 अनोळखी इसमांनी फिर्यादीस हाताचे ठोश्या बुक्क्याने मारहाण करुन त्यांच्याकडील 7000 रोख रक्कम, 5000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, वाहन चालक परवाना असे जबरीने चोरी करुन पळून गेले अशा आशयाची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच प्रस्तूत गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपीच्या वर्णनाव्यतिरिक्त इतर कोणताही धागादोरा तसेच घटनास्थळावर कोठेही सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नसतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय गळवे व डी.बी. पथकाने तपास सुरु केला. या गुन्ह्यातील दोन आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली होती. परंतु यातील मुख्य आरोपी जयेंद्र उर्फ देवेंद्र तुळशीराम वाघमारे (30) हा फरार होता व त्याला अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. याबाबत पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूूत हे अधिक तपास करीत असताना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत असताना सदर आरोपी हा ठाणा परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार भोये, तांडेल, सोनकांबळे, पो.शि.खताळ आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले आहे. याच्या अटकेमुळे अनेक दरोडे व जबरी चोेरीचे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.


थोडे नवीन जरा जुने