नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शनिवारी सत्कार समारंभ मंत्री रविंद्र चव्हाण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित होणार सन्माननवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शनिवारी सत्कार समारंभ; मंत्री रविंद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित होणार सन्मान


पनवेल (प्रतिनिधी) नुकताच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा उत्तर रायगड जिल्हा भाजपच्यावतीने शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

      उलवा नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष अनिल भगत, उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, शहर मंडल अध्यक्ष कौशिक शहा, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, खालापूर मंडल तालुका अध्यक्ष प्रविण मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. थोडे नवीन जरा जुने