पनवेल दि.२३(संजय कदम): कळंबोली परिसरातील नागरिकांना भारतीय खाद्य निगम या ठिकाणी असलेल्या धान्याच्या गोडाऊन मधून येणाऱ्या किडे ( पाखरे) यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या ठिकाणी औषध फवारणी करण्याची मागणी मा नगरसेवक रवींद्र भगत यांनी भारतीय खाद्य निगम ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनात रवींद्र भगत यांनी म्हंटले आहे की, कळंबोली परिसरातील नागरिकांना भारतीय खाद्य निगम या ठिकाणी असलेल्या धान्याच्या गोडाऊन मधून येणाऱ्या किडे ( पाखरे) हे कळंबोलीतील घराघरात येत असून पूर्ण घरात पसरले आहेत तसंच जेवण करता वेली जेवणात कीड पडत आहेत त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे किड्यांच्या पासून होत असलेल्या त्रासामुळे आपण आपल्या भारतीय खाद्य निगम या ठिकाणी अतितातकाळ औषध फवारणी करण्यात यावी जेणे करुन नागरिकांना या किडे (पाखरे ) याचा त्रास पुन्हा होणार नाही. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्या गोडाऊन मध्ये औषध फवारणी करावी अशी मागणी केली आहे.
Tags
पनवेल