पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून संविधान महोत्सवाला परवानगी






पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून संविधान महोत्सवाला परवानगी

रिकामे /आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेची पॉलिसी नसल्याने परवाना विभागाचे नाकारली होती परवानगी 
 *सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांनी आयुक्त साहेबांची भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर मिळाली परवानगी* 



सिडको महामंडळ रिकामे भूखंड जो पर्यंत जागा डेव्हलपमेंट होत नाहीत तोपर्यंत सदर जागा तात्पुरत्या भाडेतत्त्वावर देण्यासाठी सिडकोने नियमावली तयार केली आहे त्यामुळे महापुरुषांच्या जयंती , लग्न समारंभ ,मेळावे सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांच्या नियमावली नुसार चार्जेस लावून सिडको परवानगी देत होती



    पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सामाजिक आरक्षित भूखंड सिडकोने पनवेल महानगरपालिकेला हस्तांतर केले आहेत 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन असल्याने खांदा कॉलनी येथे पोलीस ठाण्यासमोरील भूखंड क्र-14 संविधान महोत्सव कार्यक्रमा साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाने महापालिकेला परवानगी मागितली होती 
      महापालिका परवाना विभागाने सदर कार्यक्रमाला आरक्षित भूखंड असल्याने परवानगी नाकारली होती मंडळाचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन सिडको यापूर्वी रिकामे भूखंड तात्पुरत्या सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देत होती तरी महापालिकेने देखील याप्रमाणे द्यावी याबाबी महादेव वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन परवानगी दिली 
       तसेच जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी सिडको प्रमाणे महानगरपालिकेने सुद्धा नियमावली तयार करावी अशी मागणी वाघमारे यांनी गणेश देशमुख साहेबांकडे केली




थोडे नवीन जरा जुने