कळंबोली वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेल्या दुचाकींचा लागला शोध







कळंबोली वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेल्या दुचाकींचा लागला शोध 
पनवेल दि २६ (संजय कदम) : कळंबोली वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेल्या दुचाकींचा शोध लागला असून वर्षभरात एकूण चार चोरीचे वाहने शोधून काढण्यात आली आहेत.   


                कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीभाऊ बानकर व पोहवा/११४८ शिंदे हे स्टील मार्केट मधील रोडच्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करून गस्त करीत असताना केडब्ल्यूसीजवळ एक दुचाकी वाहन क्र. MH46CH4211 हे बेवारस स्थितीत लावल्याचे दिसून आले. सदर वाहनाचे मालकाची आजूबाजूस पाहणी केली असता कोणीही दिसून आलेले नाही. त्यानुसार सदर वाहनाचे क्रमांकावरून इ चलान मशिनव्दारे संपर्कावरून मूळ मालकास संपर्क केला असता त्यांनी ते वाहन चोरीला गेले असून कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असल्याचे सांगितले.




 त्यानुसार सदरचे वाहन चौकीत जमा करण्यात आलेले असून मूळ मालकाची ओळख पटवण्यात आलेली आहे तसेच पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन पुढील योग्य ती कारवाई करण्यात येत आहे यापूर्वी देखील अशाप्रकारे तीन बेवारस चोरीची वाहने कळंबोली वाहतूक शाखेने शोधून काढून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.


थोडे नवीन जरा जुने