राज्य स्तरीय खो खो संघात पनवेलच्या कु श्रिया नरेश भगत हिची निवड


पनवेल दि.१०(संजय कदम): पनवेल शहरातील को.ए.सो इंदुबाई.आ.वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षक घेत असलेली कु. श्रिया नरेश भगत हिची परभणी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय खो खो स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील संघात तिची निवड करण्यात आली आहे.दिवे आगार येथे पार पडलेल्या २९ व्या पुरुष व महिला रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी २०२३-२४ खो खो स्पर्धेत कु.श्रिया भगत हिची निवड झाल्याबद्दल तिचे शाळेचे चेअरमन व्ही.सी. म्हात्रे, मुख्याध्यापिका मानसी कोकीळ व मनीषा पाटील यांच्यासह इतर शिक्षक वर्गाने तिचे अभिनंद करून तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


थोडे नवीन जरा जुने